महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray : राज्यात ८ हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश - मुख्यमंत्री ठाकरेंच्या ऊर्जा विभागाला सूचना

राज्यातील वीज संकटावर ( Power Crisis In Maharashtra ) उपाय काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऊर्जा विभागाचा आढावा ( CM Uddhav Thackeray Reviewed Energy Department ) घेतला. विजेचे संकट दूर करण्यासाठी राज्यात ८ हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती ( Generate 8000 MW Of Thermal Power ) करण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्याचे निर्देश त्यांनी ऊर्जा विभागाला दिले ( CM Thackeray Instructs Energy Department ) आहेत.

राज्यात ८ हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्यात ८ हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

By

Published : Apr 19, 2022, 9:04 PM IST

मुंबई :राज्यभरातील विजेची वाढती मागणी ( Power Demand In Maharashtra ) लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज ऊर्जा विभागासोबत झालेल्या बैठकीत ( CM Uddhav Thackeray Reviewed Energy Department ) ८ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीसाठी ( Generate 8000 MW Of Thermal Power ) तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश ( CM Thackeray Instructs Energy Department ) दिले. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली.

ऊर्जामंत्र्यांनी घेतली भेट :दरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्यातील वीजनिर्मिती वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाला वीजनिर्मितीत वाढ करण्याचे निर्देश दिले असल्याचे राऊत यांनी दुपारी सांगितले.

हेही वाचा : राज्यात कुठेही भारनियमन नाही - ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा, पहा एक्सक्लुसिव्ह मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details