महाराष्ट्र

maharashtra

मेट्रो तीनचे काम रखडणार?; मुख्यमंत्र्यांनी जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेचा चौथ्या टप्प्याचा निधी नाकारला

By

Published : Jun 16, 2021, 3:23 PM IST

मेट्रो तीनच्या कामासाठी गेले चार महिने जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (जेआयसीए) निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार आहे. तसेच पत्र जपानच्या राजदूत सुझुकी सतोषी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.

metro
metro

मुंबई -कोरोनामुळे अगोदरच मुंबईतील कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो तीन मार्गाच्या कामाला फटका बसला आहे. या प्रकल्पाची किंमत 23 हजार 136 कोटीवरून आता 33 हजार 406 कोटींच्या घरात पोहोचली आहे. तसेच गेले चार महिने जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (जेआयसीए) निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार आहे. तसेच पत्र जपानच्या राजदूत सुझुकी सतोषी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे. मात्र, पत्राला मुख्यमंत्र्यांकडून आतापर्यत उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे हा बहुचर्चित मेट्रो 3 चा प्रकल्प रखडण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असहमती-

कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा 33.5 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ स्थानके भूमिगत आणि 1 स्थानक जमिनीवर आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत २३ हजार १३६ कोटी रुपये आहे. या प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेने (जेआयसीए) अल्प व्याजदराने १३ हजार ३२५ कोटी रुपये कर्ज दिले आहे. उर्वरित निधी भारत सरकार, महाराष्ट्र शासन व इतरांनी दिला आहे. मात्र, आतापर्यत जपान आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेने २०१३ पासून तीन भागात १३ हजार ३२५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. तिसरा आणि शेवटचा भागातील २ हजार ८०० कोटी रुपये सुद्धा २०१८ मध्ये मेट्रोला देण्यात आले आहे. मात्र, आता या प्रकल्पाची किंमती आता ३३ हजार ३०४ कोटीवर जाऊन पोहचली आहे. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी देण्याची सहमती सुद्धा जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने दिली आहे. त्यासंबधीत पत्र सुद्धा जपानच्या राजदूत सुझुकी संतोषी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे. मात्र, आतापर्यत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राला सहमती दर्शवली नाही.

  • डेडलाईनवर डेडलाईन -

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गाच्या कामाला कोरोनाचा फटका बसला आहे. या मार्गाचा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2021 मध्ये प्रवाशांच्या सेवेत येणार होता. परंतु कोरोनामुळे नियोजित कामे पूर्ण होऊ न शकल्याने पहिल्या टप्प्याची डेडलाइन पुन्हा वाढली आहे. पहिला टप्पा सप्टेंबर 2022 तर दुसरा टप्पा मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा आहे. कोरोनामुळे अडचणी आल्यास पुन्हा डेडलाईन वाढण्याची शक्यता एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येण्याची डेडलाईन वारंवार वाढू लागली आहे. परिणामी मेट्रो ३ च्या प्रकल्पाचा खर्च हा आता ३३ हजार ४०६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. विशेष म्हणजे गेले चार महिने जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थने (जेआयसीए) निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला असल्याचे मेट्रो ३ प्रकल्प अडचणीत आलेला आहे. तसेच या प्रकरणात संदर्भात मेट्रो 3 प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही.

  • चेहरा भोळा अन् भानगडी सोळा-

मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने तीन हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव आहे ? गेले चार महिन्यापासून जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थान (जेआयसीए) निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला आहे. वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला जात असल्याचा आरोप सुद्धा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मेट्रोचे कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी, खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव आहे, आम्ही हे वारंवार सांगत आलोय. आता ते हळूहळू सत्य समोर येतेत, जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थिती केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details