मुंबई - राज्यात सत्तापालट झाली असून भाजप आणि एकनाथ शिंदे गट सत्तेवर आला आहे. एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पहिल्याच दिवशी कॅबिनेट बैठकीत मेट्रो-३ आरे कारशेड प्रकल्प मार्गे लावण्याची घोषणा केली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी नवे संकल्प राबवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राबवणार -मुंबईसह राज्यात विविध प्रकल्प खोळंबले आहेत. ते उभारणीवर भर दिला जाईल. तसेच रखडलेले मेट्रो, बुलेट ट्रेन, न्हावा-शेवा जलवाहतूक प्रकल्पांना गती दिली जाईल. नियोजित वेळेत हे प्रकल्प कसे पूर्ण होतील, याकडे राज्य सरकार लक्ष असेल. जनतेच्या पैशाचा गैरवापर होऊ न देता महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राबवले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.