मुंबई -मालाड कुरार पिंपरी पाडा येथे रात्री संरक्षक भिंत कोसळली. भिंतीखाली दबल्यामुळे १८ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी झाले आहेत. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शिवाय, जखमींना रुग्णालयात जाऊन भेट दिली आहे.
मालाड भिंत दूर्घटनेतील जखमींना दिली मुख्यमंत्री फडणवीसांनी रुग्णालयात भेट - heavy rain
मालाड कुरार पिंपरी पाडा येथे रात्री संरक्षक भिंत कोसळली. भिंतीखाली दबल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली मालाड दूर्घटनेवर 'ही' प्रतिक्रिया
फडवणीस यांनी म्हटले आहे, 'मालाड भिंत दूर्घटनेबद्दल तीव्र दु:ख होत आहे. जीव गमावलेल्यांसाठी माझी सहानूभूती आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांसाठी मी ५ लाखांचा रुपये सहाय्यता निधी जाहीर करतो.'
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमींना शताब्दी रुग्णालयात जाऊन भेट दिली आहे.
Last Updated : Jul 2, 2019, 10:51 AM IST