मुंबई :39 दिवसानंतर राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने आपला पहिला मंत्रिमंडळ विस्तार ( Maharashtra Cabinet Expansion 2022 ) केला आहे. आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ( first cabinet expansion of CM Shinde ) भारतीय जनता पक्षाकडून 9 तर एकदाच शिंदे गटाकडून 9 असे एकूण 18 मंत्र्यांना मंत्रिपदाची जबाबदारी ( ministerial responsibility in Shindes cabinet ) देण्यात आली आहे. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोणत्या आमदाराला कोणते खाते मिळणार ( ministerial account allocation in Shinde cabinet ) , यासाठी लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वजनदार खाते मिळावे यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटातील आमदार आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत आहेत. मंत्रालयाच्या खाते वाटपाबाबत आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार ( Shinde fadvanis meeting for ministerial account allocation ) आहे. या बैठकीतून दोन्ही गटाला कोणती खाती दिले जातील यावर निश्चिती केली जाणार आहे. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांची संभाव्य खातेवाटप समोर आलेला आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे गटात असलेल्या मंत्र्यांना मिळणारी खाती खालीलप्रमाणे असू शकते.
एकनाथ शिंदे सरकारमधील संभाव्य खातेवाटप
एकनाथ शिंदे गट :
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगर विकास खाते
2) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा खाते
3) दादा भुसे - कृषी खाते
4) संजय राठोड - ग्रामविकास खाते
5) संदिपान भुमरे - रोजगार हमी खाते
6) उदय सामंत - यांना उद्योग खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते
7) तानाजी सावंत - यांना उच्च व तंत्रशिक्षण खाते
8) अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक विभाग खाते
9) दीपक केसरकर - यांना पर्यटन आणि पर्यावरण खाते
10) शंभूराजे देसाई - यांच्याकडे उत्पादन शुल्क खाते