मुंबई :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ( cabinet expansion in Maharashtra ) उद्या सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ( CM Eknath Shinde Cabinet expansion ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली आणि नांदेडचा दौरा देखील रद्द ( CM Shindes Nanded Hingoli tour canceled ) करण्यात आला आहे. त्यामुळेच उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्या सकाळी 11 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे हा शपथविधी ( CM Shindes govt swearing in ceremony ) पार पडणार असून जवळपास 22 ते 25 मंत्री या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ( CM Shindes cabinet expansion ) शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
नऊ मंत्रीपदे शिंदे गटाला ? -यामध्ये आठ ते नऊ मंत्रीपदे एकनाथ शिंदे गटाला आले तर उर्वरित मंत्रिपदे ही भारतीय जनता पक्षााकडे जाणार आहे. गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून या मंत्रिमंडळात भाजपतर्फे तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ठाकरे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना या विस्तारात प्रथमच संधी दिली जाईल असे सांगण्यात येत आहे.