महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारला पदभार - Cm Eknath Shinde office charge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाची सजावट करण्यात आली. शिंदे आणि भाजप सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली आहे.

Cm Eknath Shinde will take charge of office today
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jul 7, 2022, 10:53 AM IST

Updated : Jul 7, 2022, 11:08 AM IST

मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाची सजावट करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपला एक वेगळा गट निर्माण केला होता. नंतर या गटाने भाजपसोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन झाली. शिंदे आणि भाजप सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेतील आमदार तर फुटलेच आता खासदार देखील पक्ष सोडतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गळतीमुळे शिवसेना कमी कमी होत असून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उद्धव ठाकरेंकडून तिच्या पुनर्बांधणीचे प्रयत्न होत आहे.

Last Updated : Jul 7, 2022, 11:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details