महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट! - 12 आमदारांच्या नावाची यादी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी ( CM Eknath Shinde will meet) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवनावर जात भेट घेणार असल्याची माहिती आहे. विधानपरिषद शिवसेना 12 आमदारांच्या नावाची यादी (List of names of 12 MLAs) ते राज्यपालांना देणार असल्याची माहिती आहे.

Etv BharaThe Chief Minister will meet the Governort
Etv Bharat मुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट

By

Published : Sep 6, 2022, 12:39 PM IST

Updated : Sep 6, 2022, 2:48 PM IST

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी (CM Eknath Shinde will meet) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवनावर जात भेट घेणार असल्याची माहिती आहे. विधानपरिषद शिवसेना 12 आमदारांच्या नावाची यादी ते राज्यपालांना देणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेली 12 आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या 12 आमदारांची यादी तयार करुन राज्यपालांना भेटण्यासाठी त्यांनी आज वेळ मागितली आहे लवकरच ते भेटतील असे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद स्विकारल्या पासुन ठाकरे गट आणि शिंदे गटात चागंलेच वाद रंगले आहेत. ठाकरे गटाचे निर्णय रद्द करण्यापासुन ते प्रत्येक गोष्टीत अडवणुक सुरु असुन आम्हीच खरी शिवसेना हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दसरा मेळाव्याचा वाद सध्या गाजत असताना राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांना देण्यात आलेली दोन वर्षांपासून रखडलेली बारा आमदारांची यादी राज्यपालांनी तडकाफडकी रद्द केली.

या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहेत. राजभवनात गणपती बाप्पा विराजमान आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीची यादी रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री नवी 12 आमदारांची यादी देणार आहेत अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी!

Last Updated : Sep 6, 2022, 2:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details