मुंबई -औरंगाबाद येथील अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संजय सिरसाट यांना लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. शिवसैनिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. संजय सिरसाट यांच्या समर्थनार्थ औरंगाबाद येथून मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बोलत होते.
आमदार संजय सिरसाट यांचे शक्तिप्रदर्शन -औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात औरंगाबादवरुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना प्रतिसाद देत एकच जयघोष केला. संजय सिरसाट यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शन केले.