मुंबई -ईडीच्यावतीने करण्यात येत असलेली कारवाई योग्यच असून ईडी ( Enforcement Directorate ED ) किंवा कोणतीही यंत्रणा सूडबुद्धीने कारवाई करते असे म्हणता येत नाही. बाळासाहेबांच्या भूमिकेचे सरकार आहेत, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी मी ईडीचा अधिकारी नाही असे, उद्गार काढले. संजय राऊत ( Sanjay Raut ) नेहमी म्हणतात मी कारवाईला समोर जाईल, कर नाही त्याला डर कशाला, असेही ते म्हणाले. ईडी कारवाई होती म्हणून आमच्याकडे येऊ नका, सेनेत येऊ नका भाजपमध्ये जाऊ नका, केंद्रीय यंत्रणांनी सुडाने कारवाई केली असती तर, न्यायालयाने नक्की सुटका केली असती असे शिंदे म्हणाले.
नुकसानीचे पंचनामे लवकरच होतील -पंचनामे दोन तीन दिवसात पूर्ण होतील, शेतकऱ्याला दिलासा देण्याचा काम पूर्ण करू, जल वहिनी बदलण्याची मागणी होती, पाईप बदलेल तर २०० कोटी लागणार आहेत. टंचाई असल्याने सात दिवसाला पाणी मिळत आहे, त्यामुळे दोनशे कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. त्यासाठी विशेष योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
घाटी रुग्णालय खाजगी करण्याला विरोध -बँकांचे कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, तशा सूचना देण्यात आल्या. भागवत कराड, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी त्यासाठी बैठक घेणार आहेत. त्यासाठी लागणारे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेरूळ घृष्णेश्वर बाबत काही मागणी होती. परभणीची पाणी योजना पूर्ण करण्याच्या योजना आहेत. नांदेड, जालना समृध्दी योजना, औंढा नागनाथ विकास बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. घाटी रुग्णालय खाजगी करण्याला विरोध होता त्यावर सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -ED Raid at Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा, अटक होण्याची शक्यता
संकेत सरगरला 30 लाखाचे बक्षिस -बाळासाहेब ठाकरे स्मारक पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक प्रस्ताव आहेत, ते तात्काळ शासन स्तरावर पाठविण्याच्या सूचना दिली आहे. सांगली येथील खेळाडूंनी बरमिंगहम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं त्याला तीस लाखांचे बक्षीस तर, प्रशिक्षकला साडे सात लाखांचे बक्षीस जाहीर.
दुष्काळी भागात समुद्रातील वाहून -मुंबई मधील रस्ते सिमेंटचे होणार, ग्रामीण शहरी भागात होणारे रस्ते दर्जेदार होतील, काम चांगलं झालं नाही तर कोणाला पाठीशी घातल जाणार नाही. आपल्याला राज्यातील सर्व पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत बाबत निर्णय घेणार, मी बोलणार त्यांची अमलबजावनी करणार, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, मी आणि उपमुख्यमंत्री काम करतोय. शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय, पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय, इतर निर्णय घेतला आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरण -शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंबलबजावणी संचालनालयाने ( ED Officers ) छापा टाकला. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पहायला मिळत आहेत. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अनेकांकडून सतप्त प्रतिक्रीया येत आहेत. जाणून घेऊयात काय आहे नेमक पत्राचाळ घोटाळा प्रकरण.
काय आहे पत्राचाळ घोटाळा ? -मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा पत्राचाळ घोटाळा सुरू झाला ( Patra chawl corruption ) . ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते.
पत्रा चाळीची स्थिती काय? -चौकशीअंती घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या विकासकाकडून राज्य सरकारने प्रकल्प काढून घेतला आणि तो म्हाडाकडे सोपवला. रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी सरकारने सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार जूनमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी देण्यात आली. 25 ऑगस्ट 2021 च्या आकडेवारीच्या आधारे प्राथमिक माहितीनुसार पुनर्वसन इमारतींचे आतापर्यंत केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 60 टक्के काम पूर्ण करून घरांचा ताबा देण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील असे म्हसे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पात म्हाडाचाही हिस्सा असून म्हाडाला विक्रीसाठी 2700 घरे मिळणार आहेत. या घरांच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2700 मधील 356 घरांसाठी मंडळाने 2016 मध्ये सोडत काढली असून आज पाच वर्षे झाली या घराचे विजेते ताबा कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. म्हाडाच्या विक्रीयोग्य घरांच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाल्यास या विजेत्यांनाही दिलासा मिळणार आहे.
जमीन अन्य आठ बिल्डरांना विकली -गुरु आशिष कंपनी ( Guru Ashish Company ) चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.
जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली -ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतांचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांचा मित्र आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीकडून 83 लाखांचे कर्जही घेतले ( Varsha Raut took 83 lakhs loan ) होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.
प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ प्रकरण नेमक आहे काय? - ज्या प्रकरणात संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे, त्याबद्दल बोलायचे झाले तर ते प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन प्रकरण आहे. यापूर्वी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची 2 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. याशिवाय प्रवीण राऊत यांची 9 कोटींची मालमत्ता त्यावेळी जप्त करण्यात आली होती. तर पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणाची चौकशी करणार्या ईडीला फेब्रुवारीमध्ये माहिती समजली होती, की प्रवीण राऊत यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातून वर्षाला 55 लाख रुपये दिले होते. संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हॉटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था आणि तिकिटे बुक करण्यात आली असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले होते.
पीएमसी बँक घोटाळ्यातही प्रवीण राऊत - 2 जानेवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधातील खटला सुरु आहे. यापूर्वी 31 डिसेंबर 2020 रोजी प्रवीण राऊत यांची 72 कोटी 65 लाखांची स्थावर मालमत्ता पीएमसी बॅक घोटाळाप्रकरणी ईडीने जप्त केलीय असंही ईडीने स्पष्ट केलंय.
ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झाला वाद -खासदार संजय राऊत यांचा एक खळबळजनक ऑडिओ व्हायरल ( Sanjay Raut Viral Audio clip ) होत आहे. ज्यामध्ये ते एका महिलेला मालमत्तेबाबत गलिच्छ शब्दात शिवीगाळ करत आहेत. संजय राऊतानी एका महिलेशी आपल्या नावावर मालमत्ता केल्यामुळे वाद घालत आहेत. संजय राऊत या महिलेला आणखी वाद घातल्यास तिच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकीही देत आहेत. मात्र, ईटीव्ही भारत या ऑडिओला दुजोरा देत नाही.
हेही वाचा -NIA Raid In Kolhapur : आयसीस कनेक्शन प्रकरणी कोल्हापूरात NIA चा छापा; दोघांना घेतले ताब्यात