महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde Meet Ratan Tata : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटांची भेट; म्हणाले... - Eknath Shinde ratan tata meet

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांची मुंबईत भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Eknath Shinde ratan tata meet
एकनाथ शिंदे रतन टाटा भेट

By

Published : Jul 27, 2022, 5:00 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांची मुंबईत भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर टाटा यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले होते. तसेच शुभेच्छाही दिल्या होत्या.

सदिच्छा भेट असल्याची माहिती -एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची रतन टाटा यांच्यासोबतची ही पहिलीच भेट होती. या भेटीत उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शिंदे म्हणाले की, टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी माझे मनापासून अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details