मुंबई - काही दिवसांपूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच खाते वाटप जाहीर करु असे म्हटलं होते पण खाते वाटप जाहीर होत नव्हतं त्यावरुन शिंदे सरकारवर टीका करण्यात येत होती तसेच माध्यमांत खाते वाटपाची एक यादी फिरत होती पण फडणवीस यांनी तुम्ही जी यादी फिरवत आहे त्यापेक्षा वेगळी खाती देण्यात येणार असल्याचे म्हटलं होते त्यानुसार शिंदे फडणवीस सरकारने आता खाते वाटप जाहीर केलं see full cabinet ministry allocated to Maharashtra ministers आहे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन नगर विकास माहिती व तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक प्रकल्प ) परिवहन पणन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मृद व जलसंधारण पर्यावरण व वातावरणीय बदल अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह वित्त व नियोजन विधी व न्याय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण ऊर्जा राजशिष्टाचार ही खाती असतील