मुंबई -कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Home Minister Amit Shah mumbai visited यांनी मुंबईत येऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai Municipal Corporation Elections १५० चा नारा दिल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी, शिंदे गट व भाजपाच्या आमदारांना तसेच मंत्र्यांना त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे या स्नेहभोजनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांना सुद्धा आमंत्रित केले जाणार असल्याची चर्चा आहे. येणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने या स्नेहभोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चारी मुंड्या चित करण्याचे प्रयत्न? :राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे व फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारसाठी येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक हे पहिले आव्हान असणार आहे. त्यातच कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेते, कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर १५० नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट दिलं असल्याकारणाने आता फक्त भाजपच नाही तर शिंदे गटासाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीसाठी ज्या पद्धतीने अमित शहा यांनी भाजप नेत्यांना काल संबोधित करताना," कही भी मारा तो चोट लगती है, पर घर के सामने मारा तो दिल को चोट लगती है." या शब्दात मुंबईच्या मैदानातच शिवसेनेला चारी मुंड्या चित करायचे आवाहन भाजप नेत्यांना केले. परंतु हे आव्हान पेलण्यासाठी आता भाजप बरोबर शिंदे गटाचे आमदार सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतील आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आज हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.