मुंबई - शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना भवनवर दावा करणाऱ्या शिंदे गटाने पर्यायी शिवसेना भवन उभारण्याच्या हालचाली CM Eknath Shinde new office केल्या. मात्र, काहीच दिवसांत ठाण्यातील अनाथ आश्रममध्ये आपले बस्तान बसवले. आता दादरमध्येच शिंदे गटाने मध्यवर्ती कार्यालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या CM Eknath Shindenew office in front of Shiv Sena Bhavan आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनाभवन समोरील वास्तू सेंट्रल इमारतीचे दोन मजले ताब्यात घेऊन तेथे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले जाणार असल्याचे समजते.
मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यासाठी जागा शोधण्याच्या हालचाली सुरूएकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंग लागला यानंतर झालेल्या सत्तांसंघर्षात शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाने यानंतर शिवसेना भवन आणि चिन्हावर दावा केला. सध्या शिवसेना कोणाची? हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. मात्र दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्यावर शिंदे गट ठाम आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर दादारमध्येच मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यासाठी जागा शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
वास्तु सेंटरमध्ये कार्यालयशिवसेना भवन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वास्तु सेंटर इमारतीच्या दोन मजल्यांवर शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले जाणार Shiv Sena Bhavan in Dada आहे. यासाठी जागा भाड्याने घेण्यात येणार असून याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्यावरती कार्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी new office in front of Shiv Sena Bhavan दिली.
तर कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळाआगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने दीडशे जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. शिंदे गट आणि मनसेला यासाठी हाताशी घेतले आहे. शिवसेनेच्या बालेकिल्लातील मतांची विभागणी व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मुंबईतील सहा आमदारांनी शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता आहे. काही माजी नगरसेवकांनाही शिंदे गटात खेचण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबईतून ठाकरेंची शिवसेना हद्दपार करण्याचा भाजपच्या मनसुबा आहे. शिंदे गटाने भाजपला साथ दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईत शिवसेनेची ताकद असल्याने उद्धव ठाकरे भाजप, मनसे आणि शिंदे गटाचा कसा सामना करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर या निवडणुकीत ठाकरे गटाला फटका बसल्यास शिंदे गटाचा कार्यालय उभे राहण्याचे मार्ग मोकळे होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. CM Eknath Shinde new office in front of Shiv Sena Bhavan
हेही वाचाVIDEO मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिवसेना- भाजप युतीबाबत मोठे विधान; म्हणाले...