मुंबई-बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सातत्याने शिवसेनेत बंडखोर नेत्यांना उद्देशून गद्दार म्हटलेले आहे. असे राजकीय हाडवैर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी वेळ आल्यावर बोलेने असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( birthday wishes to Uddhav Thackeray ) ट्विटमध्ये म्हटले, की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख पक्षप्रमुख केला नाही. त्यामुळे शिंदे गट यापुढे आक्रमक पवित्रा ठेवत आणखी धक्के देणार असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच केला होत पलटवार-शिवसेनेतून पालापाचोळा बाहेर पडल्याने आता शिवसेना स्वच्छ झाली आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या पहिल्या भागात केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालापाचोळ्यानेच आता इतिहास घडवला असून जनतेला सत्य परिस्थिती माहित आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका :एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिंदे यांनी बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि शिंदे गट असा वाद यामुळे रंगला आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच शिंदे गटावर चौफेर टीका केली.