मुंबई -भंडारा जिल्ह्यातील एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. त्याप्रकरणी फरार आरोपींना अटक करुन तात्काळ कारवाई करावी. तसेच, अशा घटना रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंमलात आणलेला शक्ती कायदा केंद्र शासनाच्या मंजुरी अभावी रखडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Dcm Devendra Fadnavis ) केंद्राकडे यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. हा कायदा मंजूर झाल्यास महिलांना न्याय मिळेल, असेही त्या म्हणाल्या. 'ईटीव्ही भारत'शी गोऱ्हे यांनी संवाद साधला ( Neelam Gorhe On Shakti Law ) आहे.
आरोपींवर कारवाई करा - भंडारा जिल्ह्यात एका महिलेला घरी सोडतो असे सांगत जंगलात नेऊन सलग दोन दिवस अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. आणखीन दोघांनीही अशाच प्रकारचे कृत्ये केले. महिलेवर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. ही दुर्दैवी घटना आहे. घटनेतील मूळ आरोपी अद्याप पकडला गेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. फरार आरोपींवर तात्काळ अटक करून कठोर कारवाई, असे गोऱ्हे यांनी पोलिसांना सुचना दिल्या आहेत.