महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde on Cabinet Expansion : इंतजार की घडिया खत्म हुई.. विरोधी पक्षांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

आज मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde comment on opposition ) यांनी इंतजार की घडिया खत्म हुई, अशा पद्धतीचा टोमणा विरोधी ( eknath shinde cabinet expansion ) पक्षाला लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. लवकरच, लवकरच, लवकरच अशा पद्धतीचा टोमणा वारंवार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे - फडवणीस या दोन व्यक्तींच्या ( maharashtra cabinet expansion ) सरकारला लगावला होता. याला एकनाथ शिंदे ( Eknath Shinde on Cabinet Expansion ) यांनी आज प्रत्युत्तर दिले.

cm eknath shinde comment on opposition
एकनाथ शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार

By

Published : Aug 9, 2022, 2:02 PM IST

Updated : Aug 9, 2022, 4:26 PM IST

मुंबई -एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांनी 30 जून रोजी अनुक्रमे ( cm eknath shinde comment on opposition ) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार ( Eknath Shinde on Cabinet Expansion ) झालेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार ( eknath shinde cabinet expansion ) होत नसल्याने सातत्याने शिंदे - फडणवीस सरकारवर टीका होत होती. परंतु, आज विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंतजार की घडिया खत्म हुई, अशा पद्धतीचा ( maharashtra cabinet expansion ) टोमणा विरोधी पक्षाला लगावला आहे.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा -Water Flooded Andheri Subway : मुंबईतील अंधेरीच्या भुयारी मार्गात तुंबले पाणी

मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. लवकरच, लवकरच, लवकरच अशा पद्धतीचा टोमणा वारंवार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे - फडवणीस या दोन व्यक्तींच्या सरकारला लगावला होता. त्यावरूनच अखेरकार आज 39 दिवसांनंतर शिंदे - फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला व आज 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर आता लवकरच पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दुसरा टप्पा सुद्धा पूर्ण केला जाणार आहे. या कारणावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, इंतजार की घडिया खत्म हुई, असे सांगत विरोधी पक्षाला टोमणा लगावला आहे.

भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार -आज शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे व मंगल प्रभात लोढा या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेनेकडून मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार - तसेच आज शिवसेनेकडून शपथ घेणाऱ्यांमध्ये संदिपान भुमरे, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर, तानाजी सावंत व शंभूराज देसाई या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion 2022 : मंत्रिमंडळ विस्तार झाला, आज रात्री होणार खातेवाटप !

Last Updated : Aug 9, 2022, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details