मुंबई - खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचे सरकार ( Eknath Shinde BJP Government ) आपल्यासमोर आहे. बाळासाहेबांचे स्वप्न ( Eknath Shinde On Balasaheb Thackeray ) साकार झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर, आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक ( Eknath Shinde On Shivsena ) आहेत. आता आपण मिळून महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि अपक्षांसह ५० हून अधिक आमदार सुरत, गुवाहाटी आणि गोवा येथे होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde BJP Government ) यांनी मुख्यमंत्री पदाची, तर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Guide MLA ) यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व बंडखोर आमदार ११ दिवसांनी मुंबईत आले. त्यावेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा -Shiv Sena Workers Loyalty Certificate : शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून घेणार एकनिष्ठेची प्रमाणपत्र
बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - यावेळी बोलताना, या आधी सावरकरांचा अपमान करणारे सरकार होते, दाऊदसोबत संबंध असणारे लोक सरकारमध्ये होते. हे सारे अस्वस्थ करणार होते. खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचे सरकार आले आहे. बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले आहे. आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही, तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षांच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत. त्यांना कामाचा प्रचंड अनुभव आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे व भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभारी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.