मुंबई:बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली Maharashtra Guardian Ministers List आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,