महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gadchiroli Flood : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर

गडचिरोलीत होत असलेल्या अतिवृष्टीच्या ( Gadchiroli District Flood Situation ) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत.

devendra fadnavis eknath shinde
devendra fadnavis eknath shinde

By

Published : Jul 11, 2022, 4:08 PM IST

मुंबई - गडचिरोलीत होत असलेल्या अतिवृष्टीच्या ( Gadchiroli District Flood Situation ) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. गडचिरोलीत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले आणि नद्या ओसंडून वाहत आहेत. याचा फटका गडचिरोली येथील सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गडचिरोली मध्ये दोन दिवसाचा रेड अलर्ट देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत.

आज ( 11 जुलै ) सायंकाळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करतील. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी बरोबर बैठक घेऊन तातडीने मदत कार्य संबंधित घेतलेल्या निर्णयाबाबत चर्चा करतील. तसेच, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पुराचा फटका बसू नये, यासाठी उपायोजनाच्या देखील चर्चा या बैठकीत केल्या जाणार आहेत.

गडचिरोलीत रेड अलर्ट - पुढील दोन दिवस गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यानंतर रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील शाळा कॉलेज दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच, आवश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील नद्यांना आलेला पुरामुळे अनेक ठिकाणी महामार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक सेवादेखील विस्कळीत झालेली पाहायला मिळते.

हेही वाचा -Militant Killed in Encounter : अवंतीपुरातील चकमकीत दोन अतिरेकी ठार

ABOUT THE AUTHOR

...view details