मुंबई - शिवसेना आणि शिंदे सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सरन्यायाधीशांनी पक्षप्रमुखांना गटनेता तर सदस्यांना नेता नेण्याचे अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवले. सरन्यायाधीशांच्या निरीक्षणामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते. मात्र, राज्यघटनेनुसार आम्ही सरकार स्थापन केले आहे. नियमबाह्य असे त्यात काही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत शिवसेनेवर टीका ( CM Eknath Shinde About Supreme Court hearing ) केली. मंत्रालयात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याचिकांवर पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी - सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या चार याचिकांवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश रमन्ना यांनी आठ दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करून १ ऑगस्टला पुढील सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र कोर्टाने तसे केले नाही. सध्या ते स्वतःचे पाठ थोपटून घेत आहेत. घेऊ देत, मात्र आम्ही राज्यघटनेनुसार सरकार बनवले आहे. त्यात नियमबाह्य असे काही केलेले नाही, असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.