महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांकडून 'वेगळ्या विदर्भा'च्या मु्द्द्याला बगल! - महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा

राज्यात गेले कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले आहे. भाजप शिवसेना युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलतना त्यांनी, माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, असे बोलत प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 5, 2019, 8:27 AM IST

मुंबई -महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करत, वेगळ्या राज्याची मागणी महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शुक्रवारी मुंबईत भाजप-शिवसेना यांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी त्याविषयी बोलण्याचे टाळले आहे.

हेही वाचा... खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात अनेक घटकांकडून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात येत आहे. विरोधी पक्षात असताना नेहमी वेगळा विदर्भ हवा, अशी भूमिका घेणारे फडणवीस यांनी मात्र अनेक दिवसांपासून या प्रश्नावर मौन पाळल्याचे दिसत आहे. शुक्रवारी भाजप-शिवसेना महायुतीच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांना वेगळ्या विदर्भाबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता, त्यांनी पत्रकारांना नवीन हेडिंग करा.. असे उत्तर दिले. तसेच माझी विदर्भाबाबतची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दबावामुळे भाजपने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा मागे टाकल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा... दिग्गजांच्या तिकीट कपातीने मुख्यमंत्र्यांचे आसन बळकट

ABOUT THE AUTHOR

...view details