मुंबई -डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या आधी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र, आता या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच करणार आहे.
या प्रकरणी झालेल्या सुनावणीत बुधवारी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता ओळखून मुख्यमंत्र्यांनी क्राईम ब्रँचकडे याचा तपास सोपवला आहे.
काय आहे प्रकरण -
पायलने मिरज-सांगली येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मागील वर्षी टोपीवाला महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. मात्र, तिला हा प्रवेश आरक्षित कोट्यातून मिळाल्यामुळे तिचे ३ सीनियर्स तिला टोचून बोलत होते. यामुळे तिने त्यांच्या जाचाला कंटाळून २२ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. जातिवाचक टोमणे, रुग्णांसमोर अपमान, प्रॅक्टिस करू देणार नाही, अशी धमकी देणे असा पायलचा मानसिक छळ सुरू असल्याचा दावा पायलच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.