मुंबई -राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असताना सत्तेच्या बाजारात टीका-टिप्पनी सुरू आहे. अतिवृष्टीकडील दुर्लक्षानंतर बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.