मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नुकतीच 'जन आशीर्वाद' यात्रा काढण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेपुढे जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महाजनादेश यात्रा' काढणार आहेत. यासाठीची घोषणा रविवारी गोरेगाव येथे भाजपच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मोझरी या गावातून ही यात्रा १ ऑगस्ट रोजी निघणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून काढण्यात येत असलेली ही यात्रा २५ दिवस चालणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेचे संपूर्ण नेतृत्व करणार आहेत.
यात्रेचे प्रमुख सुरजित सिंह ठाकुर राज्यातील ३० जिल्ह्यात ही यात्रा जाणार असून सुमारे ४ हजार ५०० किमीचा प्रवास या यात्रेचा असणार आहे. तीनशेहून अधिक सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असून या सभाच्या माध्यमातून राज्यातील मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला जाणार आहे. राज्यात मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन याच निर्धाराने मुख्यमंत्री या यात्रेत जनतेपर्यंत पोचणार आहेत, या यात्रेला जनाधार मिळणार आहे, लोकांना विकास आणि विश्वास आहे देण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे.
या यात्रेत राज्यातील १५२ विधानसभा क्षेत्र कव्हर करण्याचा प्रयत्न असल्याने मोठ्या, १०४ जाहीर सभा या दरम्यान घेतल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री स्वतः या यात्रेचे नियोजन करत असून त्याचा मार्गही ठरला आहे. ते यात २५ दिवस यात्रा करणार आहेत. ही यात्रा ज्या गावात पोचेल त्या गावात कोणत्याही कार्यकर्त्याने मंदिरात अथवा इतर कोणत्या ठिकाणी येण्यासाठी, आग्रह करू नये, पुष्पहार घालन्याठी कोणी आग्रह करू नये. अशा सूचना या यात्रेचे प्रमुख सुरजित सिंह ठाकुर यांनी सांगितले.
यात्रेच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहेत. ही यात्रा पहिल्या टप्प्यात मोझरी ते नंदुरबार आणि दुसऱ्या टप्प्यात अकोले, अहमदनगर आणि समारोप हा नाशिक येथे होणार आहे.