मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई येथे माध्यमांसोबत बोलताना, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याचा विषय आमचा कधीही ठरला नव्हता', असे म्हटले आहे. यामुळे राज्यातील सत्ता संघर्ष आता तापताना दिसत आहे.
हेही वाचा... राज्यात सत्ता स्थापनेसाठी दबावतंत्र, रावतेंनंतर मुख्यमंत्र्यांनीही घेतली राज्यपालांची भेट
राज्यातील शिवसेना आणि भाजप सत्तेतील पद वाटपावरून एकमेकांवर कुरघोडी करताना पहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना नेते आणि पदाधिकारी आपल्या वक्तव्यातून भाजपला इशारा देत आहेत, तर भाजपही दबावाचे राजकारण करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आपले मत व्यक्त केले आहे;
हेही वाचा... महाराष्ट्रात कोणी दुष्यंत नाही ज्याचे वडील तुरुंगात आहेत.. 'शिवसेना सत्तेसाठी भुकेलेली नाही'
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- चांगला जनादेश आम्हाला मिळाला आहे, आम्ही लवकरच सरकार स्थापन करू
- पुढील पाच वर्षे राज्याला स्थिर सरकार भाजपच्या नेतृत्वात स्थापन होईल.
- यश-अपयश आले तरी आम्ही समाधानी आहोत. तीस वर्षात इतका मोठा स्ट्राईक रेट आमचा नव्हता, तो आम्हाला मिळाला. जनतेने आम्हाला विश्वास दिला आहे.
- आम्ही पहिल्या मेरिटमध्ये आलो नाही पण फस्ट क्लास फस्ट आलो आहे. त्याची कोणीच चर्चा करत नाही.
- राजकारणात पावसातही भिजावं लागतं, तिथेच आमचा अनुभव कमी पडला.
- भाजपचे कपडे घालून ज्यांनी आत्महत्या केली, त्याच्याकडे एक एकरही शेती नाही.
- अमित शहा उद्या येणार नाहीत, मात्र अनधिकृत आणि अधिकृत बैठका सुरू आहेत.
- अबकी बार २२० पार, असे निवडणुकीत बोलावेच लागते.
- शिवसेना भाजप यांच्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याचा विषय कधीही ठरला नव्हता.
- आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार बनवणार आहोत. आम्ही कधीही मुहूर्त काढला नाही, पण लवकर माहिती दिली जाईल. आमचा फार्म्युला काय आहे हे देखील लवकर कळेल.