राणेंना आव्हान देणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री ठाकरेंनी थोपटली पाठ
दिवसभरात नारायण राणे यांना अटक आणि शिवसेना भाजपाचा राडा प्रकरण सुरू असतानाचा, युवासेनेने लक्षवेधून घेतल्याचे दिसून येत होते. त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी वरून सरसाई देखील उपस्थित होते. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल आहे.
मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यात भाजपा शिवसेनेत जोरदार राडा पहायला मिळाला. राणेंच्या वक्तव्यांवर युवा सेना चांगलीच आक्रमक झाली होती. युवा सेनेने थेट जुहू येथील राणेंच्या निवास्थानाबाहेर जाऊन निदर्शने केली. यावेळी युवासेना सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरून सरदेसाई यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत थेट राणे आणि भाजपाला आव्हान दिले होते. युवासेनेच्या या कामगिरीवर खुष होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केले आहे.