मुंबई - आतापर्यंत वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना वाहन धारकांच्या बोनेटला पकडून फरफटत जाताना आपण पाहिले आहे. मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. अशीच एक कारवाई करताना क्लीनअप मार्शल बोनेटला पकडून फरफटत जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
विनामास्क वाहनांवर करत होते कारवाई -
मुंबईत गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून पालिकेने मास्क लावणे सक्तीचे केले आहे. मास्क लावला नसेल किंवा रस्त्यावर थुंकल्यास दंड वसूल केला जातो. त्यासाठी पालिकेने विभागवार क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. विनामास्क नागरिकांकडून 200 रुपये तर रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल केला जात आहे. त्यासाठी क्लीनअप मार्शल तैनातही करण्यात आले आहेत.