मुंबई पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना दिलेला क्लीनचिट अहवाल समोर आला आहे. पोलिसांच्या अहवालात पूजा चव्हाण हिची आत्महत्या किंवा अपघाती निधन ( BJP leader Chitra Wagh ) झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. पूजाचे प्रकरण ( Pooja Chavan Suicide Case ) भाजपने उचलून धरल्याने मंत्री संजय राठोड ( Minister Sanjay Rathod ) यांना तत्कालीन वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज त्याच भाजपसोबत शिंदे गटाने केलेल्या युतीमध्ये राठोड मंत्री आहेत.
शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची घेतली शपथ शिंदे सरकारमध्ये संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर टीका केली. राठोड यांच्या मंत्रीपदाचा वाद क्षमत असताना, आता संजय राठोड यांना पोलिसांकडून मिळालेली क्लीनचिट समोर आली आहे. पूजा चव्हाणप्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. शिवाय, पूजा चव्हाण हीचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघाती मृत्यूने झाल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. या क्लीन चिटमुळे पुन्हा एकदा राठोड यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याटिक टॉक स्टार पूजा चव्हाणने ७ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप होता. तत्कालीन विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी विधानसभेत संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
कायदेशीर नोटीस बजावणारनिःपक्षपाती चौकशीसाठी मी स्वतः राजीनामा दिला. आता पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. जेव्हा आरोप झाले तेव्हा मानसिक तणावात होतो. गेली ३० वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात वावरतोय. मात्र, माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला. या आरोपामुळे बाजूला होतो. आता पोलिसांनी राजपत्र प्रकाशित केले आहे. त्यामुळे निष्कलंक असून शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये शपथविधी घेतल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत गप्प होतो मात्र पुन्हा आरोप केल्यास कायदेशीर नोटीस बजावणार, असा इशाराही राठोड यांनी दिला आहे.
संजय राठोड यांनी मंत्रिपद दिल्यावर चित्रा वाघ नाराज -शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या विस्तारात आरोप असलेले आमदार संजय राठोड यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्याबाबत पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले, की पुजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवणार आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. शिवसेनेचे आमदार संजय राठोड ( Shiv Sena MLA Sanjay Rathod ) यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह -आमदार संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. यावर चित्रा वाघ यांना विचारले असता त्या म्हणाल्या होत्या, की आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलीस आयुक्तांना जाऊन विचारावा. मी माझी लढाई अजूनही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. तसेच, पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लिन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याचबरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही, असेही यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.
हेही वाचा : धाडीत 390 कोटींचे घबाड पाहून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी हैराण