महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार - school open in corona free area

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी घेण्यात आलेला होता. मात्र, अवघ्या काही तासात जाहीर केलेल्या शासन निर्णयात तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण देत संकेस्थकावरून हटविण्यात आलेला आहे. मात्र, आता शासनाने त्रुटी दुरुस्त करून आज नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे.

शासन निर्णय जाहीर
शासन निर्णय जाहीर

By

Published : Jul 7, 2021, 5:38 PM IST

Updated : Jul 7, 2021, 7:22 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी घेण्यात आलेला होता. मात्र, अवघ्या काही तासात जाहीर केलेल्या शासन निर्णयात तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण देत संकेस्थकावरून हटविण्यात आलेला आहे. मात्र, आता शासनाने त्रुटी दुरुस्त करून आज नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील कोविड मुक्त भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहे.

आज काढला शासन निर्णय
राज्यातील कोविड मुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले. गेल्या वर्षीपासून राज्यांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव सुरू झाला आणि राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे सर्व आस्थापना त्याचबरोबर शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या होत्या. 15 एप्रिल 2021 रोजी दुसऱ्यांना लॉकडाऊन जाहीर झाले. मागील वर्षी शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण प्रक्रिया चालू होती. आता कोरोनावर हळू-हळू नियंत्रण करण्यात सरकारला यश येत आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीमध्ये ऑनलाईन शाळा सुरू आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये दूरदर्शन, गुगल, झूम, दिशा अ‍ॅप, मोबाईल अशा विविध साधनांचा वापर करून शिक्षण प्रक्रिया चालू आहे. शाळा बंद असल्याने मोठया प्रमाणावर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड-मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती/स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता देत आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर
शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत भरण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशी सूचना दिली आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी दोन बाकांमध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करणे, संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शकतो त्याच गावी करणे किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याची दक्षता घ्यावी. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केलेल्या आहेत. त्यानुसार लवकरच राज्यात काही ठिकाणी शाळा सुरू होतील यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

हेही वाचा -Modi Cabinet Expansion : नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, भारती पवार मोदींच्या मंत्रिमंडळात, 43 मंत्री घेणार शपथ

Last Updated : Jul 7, 2021, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details