मुंबईआज विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व प्रसंग घडला असून सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांवर धावून गेला तर चित्र संपूर्ण महाराष्ट्राने विधानभवनात पाहिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झाले होते. 50 खोके, एकदम ओले रे आले रे, आले गद्दार आले अशा घोषणा विरोधकांकडून पहिल्या दिवसापासूनच दिल्या जात होत्या. त्या गोष्टी त्यांच्या विरोधात आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी लवासाचे खोके, सिल्वर ओके, सचिन वाजेचे, मातोश्री ओके अशा घोषणा दिल्या. सत्ताधाऱ्यांनी या घोषणा आज द्यायला सुरुवात केल्या होत्या त्यानंतर विरोधकही घोषणा द्यायला विधान भवनाच्या पायर्यांवर आले.
Maharashtra Monsoon Session त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. परिस्थितीत गांभीर्य पाहता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विरोधी आमदारांना विधानभवनाच्या आत मध्ये घेऊन गेले आणि हाणामारीपर्यंत पोहोचणारा हा प्रसंग तिथेच थांबला.
भरत गोगावले यांचा इशाराआम्हीच धक्काबुक्की केली पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून खोके आणि ओके अशा घोषणा विरोधकांकडून सत्ताधार्यां साठी दिल्या जात आहेत. या घोषणा देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदार निमुटपणे जात होते मात्र आज सत्ताधारी आमदारांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणेमुळे विरोधी चलबिचल झाले आणि म्हणून आम्ही आधी विधान भवनाच्या पायर्यांवर येऊन आंदोलन करत असताना विरोधी पक्ष तेथे का आला त्यांनी घोषणाबाजी का सुरू असा सवाल एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी उपस्थित केला. तसेच विरोधकांनी आम्हाला धक्काबुक्की केली नाही तर आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली अशी ग्वाही ही भरत गोगावले यांनी दिली आहे. तसेच आम्ही कोणालाही घाबरत नाही जर विरोधक आमच्या अंगावर आले तर आम्ही त्यांना शिंगावर घेऊ असा इशारा भरत गोगावले यांनी या प्रसंगानंतर विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना दिला आहे. मात्र विधान भवनात झालेल्या या अभुतपुर्व प्रसंगात एकनाथ शिंदे गटांच्या आमदारांनी धक्काबुक्की केली असल्याचे भरत गोगावले यांनी मान्य केले.
अमोल मिटकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे.
हेही वाचाHangama on steps of Maharashtra Assembly विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे आणि भाजप गटाचा राडा