महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीडमध्ये प्रितम मुंडेंचेही जागा धोक्यात - चित्रा वाघ - maval

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की, बीड लोकसभा मतदार संघात प्रीतम मुंडे यांची ही जागा धोक्यात असल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यात सांगितले आहे. एक्झिट पोलवर आमचा विश्‍वास नाही जे काय चित्र आहे ते दोन दिवसात समोरील समोर येईल.

प्रितम मुंडेंचेही जागा धोक्यात - चित्रा वाघ

By

Published : May 20, 2019, 8:25 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले. एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलेली आहे. बीड लोकसभा मतदार संघातील प्रीतम मुंडे यांची जागा धोक्यात असल्याचे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की, बीडमध्ये एक्झिट पोलचा अंदाज तंतोतंत खरा ठरणार असून मुंडे यांची जागा धोक्यात आहे.

प्रितम मुंडेंचेही जागा धोक्यात - चित्रा वाघ

लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. या पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत दाखवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची अशी समजली जाणारी पार्थ पवार यांची मावळ येथील जागा धोक्यात असल्याचा अंदाज काल काही एक्झिट पोल वर्तवणाऱ्या संस्थेने सांगितला. याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की, बीड लोकसभा मतदार संघात प्रीतम मुंडे यांची ही जागा धोक्यात असल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यात सांगितले आहे. एक्झिट पोलवर आमचा विश्‍वास नाही जे काय चित्र आहे ते दोन दिवसात समोरील समोर येईल. जनता कोणाच्या बाजूने आहे हेही तेव्हा कळेल. एक्झिट पोलला एवढे महत्व देण्याची आवश्यकता नाही, असेही यावेळी वाघ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details