महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्रावरील लशींची उपलब्धता पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडा - आदित्य ठाकरे - Vaccine shortage in mumbai

सध्या मुबंईत नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा सपाटा लावला आहे, मात्र लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे केंद्रावरील लशींची उपलब्धता पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडा, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना केले आहे.

केंद्रावरील लशींची उपलब्धता पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडा - आदित्य ठाकरे
केंद्रावरील लशींची उपलब्धता पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडा - आदित्य ठाकरे

By

Published : May 8, 2021, 7:05 AM IST

मुंबई - राज्याला लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लशींची उपलब्धता आहे का? याची मनपाच्या ट्विटरवर माहिती घेऊनच नागरिकांनी लसीकरणासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

चुनाभट्टी येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राचे उद्घघाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. स्थानिक शिवसेना नगरसेविका सान्वी तांडेल यांच्या पुढाकाराने हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, माजी नगरसेवक विजय तांडेल, एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज व संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवकांनी जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करा

सुरुवातीला लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेली भिती कमी झाली असून आता अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. लसीकरण केंद्रावरही नागरिकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क हा ठेवलाच पाहिजे. त्यासोबतच प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाली पाहिजेत. तसेच लसीकरण केंद्रासाठी नगरसेवकांमध्ये हेल्दी स्पर्धा असली तरी चालेल, जेणेकरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्र तयार होतील, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी केल्या.

लोअर परळ, पवईतील केंद्राचे महापौरांच्या हस्ते अनावरण

तत्पूर्वी लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील द वर्ल्ड टाँवरमधील पालिकेच्या वाहनतळाच्या जागेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी तसेच ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचे तसेच पवईच्या पवई उद्यान शाळेत सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज पार पडले.

खासदार अरविंद सावंत, माजी आमदार सचिन अहिर, जी / दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, स्थानिक नगरसेवक अँड. संतोष खरात, स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, उपायुक्त (परिमंडळ - २ ) विजय बालमवार, जी / दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

मनपाने ॲप विकसित करावा

नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांवर किती नागरिकांची आज लसीकरण होऊ शकेल ? किती लस आज उपलब्ध झाली आहे ? याची माहिती दर्शविणारा फलक लावण्यात यावा, अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. तसेच सद्यस्थितीत कोविन ॲपवर स्लॉटस मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून याबाबत राज्य सरकार किंवा मुंबई मनपाला ॲप विकसित करता येणे शक्य आहे का ? याची चाचपणी करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details