महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Toilet Built in Chandivali : आपलीच मोरी मुतायची चोरीचा प्रत्यय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांचा संताप - toilet built in chandivali by BMC money

माहिती अधिकार कार्यकर्ते रियाझ वझीर मुल्ला ( RTI Riyaz wazir Mulla ) म्हणाले की, आमच्या विभागात होणाऱ्या कामाबाबत माहिती अधिकारा अंतर्गत माहिती घेऊन आमच्या विभागात होणाऱ्या चुकीच्या कामांवर आम्ही नेहमीच आवाज उठवत असतो. ही मुतारी वापरासाठी बंद नसून ती सर्वांसाठी खुली आहे, अशी प्रतिक्रिया पालवे यांनी दिली.

Toilet Built in Chandivali
चांदीवली टॉयलेट

By

Published : Aug 11, 2022, 12:20 PM IST

Updated : Aug 11, 2022, 12:49 PM IST

मुंबई -चांदीवली वासीयांना आपलीच मोरी मुतायची चोरी म्हणीचा शब्दशः प्रत्यय' अशा आशयाचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित ( toilet built in Chandivali ) केले होते. या वृत्तामध्ये आम्ही तिथले स्थानिक आमदार दिलीप लांडे ( Dilip Lande on toilet construction ) यांची प्रतिक्रिया दिली. या बातमीचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही येथील काही नागरिकांशी व पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यातून जी आम्हाला माहिती मिळाली अतिशय धक्कादायक आहे.

लोकार्पण झाल्यापासून ही मुतारी बंदमाहिती अधिकार कार्यकर्ते रियाझ वझीर मुल्ला ( RTI Riyaz wazir Mulla ) म्हणाले की, आमच्या विभागात होणाऱ्या कामाबाबत माहिती अधिकारा अंतर्गत माहिती घेऊन आमच्या विभागात होणाऱ्या चुकीच्या कामांवर आम्ही नेहमीच आवाज उठवत असतो. या मुतारीबाबतदेखील तेच झाले. या मुतारीत काहीतरी काळबेर आहे, असे आमच्या लक्षात आले. त्यावेळी आम्ही माहिती अधिकारांतर्गत याची माहिती घेतली. त्यावेळी या मुतारीत गैरव्यवहार झाल्याचे आमच्या लक्षात आले. आता लोकार्पण झाल्यापासून ही मुतारी बंद आहे. आमची फार काही मागणी नाही. या कामात जनतेचा पैसा वापरला गेला. या पैशांवर ज्या लोकांनी डल्ला मारलाय त्यांच्यावर चौकशी करून कडक कारवाई झाली पाहिजे. इतकीच आमची मागणी आहे. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले ( toilet built in Chandivali by bmc money ) तरी आमची तयारी आहे.

अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा



मुतारी वापरासाठी खुलीयासंदर्भात आम्ही जेव्हा पालिका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी इथले वॉर्ड ऑफिसर महादेव शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मीटिंगमध्ये असल्याचं कारण देत फोन कट केला. त्यानंतर थोड्याच वेळा त्यांनी त्यांचे सहकारी मेंटेनन्स विभागाचे अधिकारी मंगेश पालवे यांचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठविला. आम्ही जेव्हा मंगेश पालवे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा पालवे म्हणाले की, तुम्ही एकदा स्वतः जाऊन त्या मुतारीची पाहणी करा. मग तुमच्या लक्षात येईल की आम्ही किती चांगली मुतारी बांधलेली आहे. या मुतारीत आम्ही युरिनल बसवले होते. त्यात इथल्या लोकांनी दगड, चिंगम टाकून ठेवले होते. त्यामुळे ते चोकअप झाले. इथल्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. आम्ही आता पुन्हा ते दुरुस्त केले आणि व्यवस्थित केलेली आहे. इथले लोक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. ही मुतारी वापरासाठी बंद नसून ती सर्वांसाठी खुली आहे, अशी प्रतिक्रिया पालवे यांनी दिली.



स्थानिक लोक व अधिकाऱ्यांच्या बोलण्यात विरोधाभासआम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो त्यात अधिकाऱ्यांनी दावा केला की ही मुतारी वापरासाठी बंद नाही ती सर्वांसाठी खुली आहे. मात्र, इथले स्थानिक ही मुतारी मागच्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याचा दावा करतात. या मुतारीचे लोकार्पण करण्यात आलं त्यासाठी अनिल परब स्वतः आले होते. त्यांच्या हस्ते या मुतारीचे लोकार्पण झालं. तो लोकार्पणाचा एकच दिवस हे मुतारी सर्वांसाठी खुली होती. मात्र, त्यानंतर या मुतारीला टाळ लावण्यात आलं ते आज देखील बंद आहे. त्यामुळे असा हा विरोधाभास या स्थानिक व अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून दिसतो.


नेमके प्रकरण काय?चांदीवली विधानसभा मतदारसंघातील काजूपाडा येथे तब्बल 14 लाखांची एक मुतारी बांधण्यात आली. ही मुतारी प्रभाग क्रमांक 163 चे माजी नगरसेवक व सध्याचे आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आल्याचे या मुतारीवरील फलकावरून लक्षात येते. 10 बाय 6 च्या मुतारीसाठी अंदाजे 3 लाख रुपये खर्च होणे अपेक्षित होते. आणि यांनी इथं तब्बल 14 लाख रुपये खर्च केले आहेत. इतका खर्च करून देखील ही मुतारी मागचे 6 महिने लोकांच्या वापरासाठी बंद आहे.

हेही वाचा-'आपलीच मोरी मुतायची चोरी' चांदीवली वासियांना म्हणीचा शब्दशः प्रत्यय

Last Updated : Aug 11, 2022, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details