पुणे - महाराष्ट्रातील काही अपवादात्मक जिल्हे सोडल्यास कोरोना रुग्ण संख्या अटोक्यात येऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मंदिरे खुली केली. आता चित्रपटगृहे व नाट्यगृहेही खुली केली जाणार आहेत. त्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार मंगळवारी राज्य शासनाने नाट्यगृहे सुरू करण्यासंदर्भातील आदेश काढले. मात्र, नाट्यगृहे सुरू करताना काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे नियम पाळून चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू होतील - मेघराज राजेभोसले - etv bharat live
22 ऑक्टोबर ला सर्व नाट्यगृह आणि मल्टीपेक्स सुरू होणार आहेत. त्यानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या बरोबर बातचीत करण्यात आली.
theatre
काय आहेत अटी या शर्ती
- चित्रपटगृहे, नाटय़गृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल.
- दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे.
- चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक आहे.
- सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे.
हेही वाचा -Gangster Suresh Pujari : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक; सूत्रांची माहिती