महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आजपासून ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू होणार - महाराष्ट्रात नाट्यगृह सुरू

मार्चपासून बंद असलेली कंटेनमेंट झोनबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होणार आहेत.

mumbai
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 4, 2020, 6:09 PM IST

Updated : Nov 5, 2020, 10:12 AM IST

मुंबई -दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नागरिकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे मार्चपासून बंद असलेली कंटेनमेंट झोनबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत आजपासून (गुरुवार) सुरू होणार आहेत. त्याचबरोबर, जलतरण तलाव आणि इनडोअर गेमसाठीही नियमांचे पालन करत सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

आजपासून ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू होणार

हेही वाचा -मुख्यमंत्री फोन घेत नसल्याने राज्यपालांची घेतली भेट, राणा दाम्पत्याचा तक्रारीचा सूर

मुंबईत मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. रुग्णांची संख्या देशभरात वाढू लागल्याने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. जून महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यानुसार राज्य सरकारने मिशन बिगिन अंतर्गत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून टप्प्याटप्याने सर्व व्यवहार सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गेली ८ महिन्यांहून अधिक काळ राज्यातील नाट्यगृह, चित्रपटगृह बंद आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमागृह मालकांकडून करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी सिनेमागृह मालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सिनेमागृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी केली होती. या संदर्भात एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृह सुरू करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

लवकरच एसओपी -

कंटेनमेंट झोनबाहेर योगा इन्स्टिट्युटही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारखे इनडोअर गेमसाठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यासंबंधीच्या एसओपीही लवकरच जारी करण्यात येणार आहे. दरम्यान शाळा आणि मंदिरे सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.

राज्यातील रुग्णांची आकडेवारी -

राज्यात काल 4 हजार 909 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली. यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 16 लाख 92 हजार 693 वर पोहचला आहे. तर 120 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 44 हजार 248 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के एवढा आहे. 6 हजार 973 रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 15 लाख 31 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.46 टक्के एवढे झाले आहे.

Last Updated : Nov 5, 2020, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details