मुंबई -बुकी सोनू जलान, केतन तन्ना आणि मुनिर खान या तिघांचा आज सीआयडीकडून (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) जबाब नोंदवण्यात येणार आहे. यासाठी या तिंघांना आज सीआयडीच्या बेलापूर ऑफिस नोंदवण्यात येणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मंगळवारी इडीने आयज इसीआयआर दाखल करताच स्टेट सीआयडी अॅक्शन मोडमध्ये आली आल्याचे दिसून येत आहे.
सोनू जलानसह केतन तन्ना आणि मुनिर खान या तिघांनी मागील आठवड्यात पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी खंडणी वसूल केल्याची तक्रार दिली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. त्याप्रकरणी त्यांचा आज (बुधवारी) २ वाजता कोकण भवन, नवी मुंबई इथे त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
सोनू जलान यांनी परमबीर सिंग यांच्यावर 3 कोटी पेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याचा आरोप लावला आहे. सोनू जलान यांच्या म्हणण्यानुसार त्यानं यासंदर्भात अनेकदा लेखी तक्रार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. यामुळे आता सोनू जलान यांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती. दरवाजा ठोठावण्याची तयारी केली आहे.