मुंबई- ईस्टर हा सण ख्रिश्चन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटसमयी आज 500 गरजूंना धान्यवाटप करून हा सण साजरा करण्यात आला. बोरीवलीतील मारथोमा चर्चचे फादर अबू चेरीयन, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर,माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, थॉमस जोसेफ यांच्या हस्ते गणपत पाटील नगर भागात धान्य वाटप करण्यात आले.
ख्रिश्चन बांधवांनी धान्य वाटप करून साजरा केला ईस्टर - मुंबई
धान्य वाटप करताना सोशल डिस्टनसिंगचे भान ठेवून नागरिकांना साहित्य नेण्यासाठी वेळ देण्यात आली होती. यावेळी 1 लाख रुपयांचे धान्य 500 कुटूंबियांना वाटप करत ईस्टर हा सण साजरा केला गेला.
धान्य वाटप करताना सोशल डिस्टनसिंगचे भान ठेवून नागरिकांना साहित्य नेण्यासाठी वेळ देण्यात आली होती. यावेळी 1 लाख रुपयांचे धान्य 500 कुटूंबियांना वाटप आले. मारथोमा चर्चने शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन घोसाळकर यांनी यावेळी केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील शिवसैनिक एकजुटीने ह्या संकटावर निश्चितच मात करतील, असा विश्वास घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.