मुंबई -दिवाळी सण सुरू झाला आहे. सामान्य लोकांची दिवाळीची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडण्यास आतशबाजी करण्यास बंदी घालण्यात आली असून केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलबाज्या, अनार उडवण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच, शांततेत व पर्यावरणाची हानी न करता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील सारिका शाहू यांनी अनोख्या पद्धतीने पर्यावरणपूरक फटाके बनवले आहेत.
हेही वाचा -पहिला दिवा 'ती'च्या समोर ठेवून 'विचारांच्या दीपोत्सवाचा' अमरावतीत शुभारंभ
चॉकलेट फटाक्यात भुईचक्रे, अनार, लवंगी, लक्ष्मी तोटे, रॉकेट
चॉकलेटला फटाक्यांचा विशिष्ट आकार देऊन त्याभोवती फटाक्याचे रॅप केलेले आहे. यामध्ये, भुईचक्रे, अनार, लवंगी, लक्ष्मी तोटे, रॉकेट असे सर्व फटाके असून ते त्या चॉकलेट पासून बनवतात. गेल्या वर्षी त्यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर देखील या फटाक्यांची निर्यात केली होती. परंतु कोविडमुळे या वेळेस ते शक्य नसल्याचे सारिका यांनी सांगितले. पण यावर्षी आपल्याच देशात या चॉकलेट-फटाक्यांना चांगली मागणी असल्याचे शाहू यांनी सांगितले. लोक या पर्यावरणपूरक फटाक्यांना पसंत करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात चॉकलेट फटाके विक्री झालेले आहेत.
चॉकलेट फटाक्यांना मोठी मागणी
गेली तीन वर्ष सारिका शाहू या दिवाळीच्या अगोदर 15 दिवस हे घरातील काम करून चॉकलेट फटाके बनवण्याचा करत असून आता दिवसाला जवळपास 15 ते 20 किलो चॉकलेट पासून बनवलेले फटाके विकले जातात. कोविड काळ असला तर लोकांची मागणी चांगल्या प्रकारे आहे, असे देखील सारिका म्हणाल्या.
हेही वाचा -धनत्रयोदशी करा सोनेरी, अमरावतीत २४ कॅरेट सुवर्ण मिठाई, किंमत ऐकून व्हाल अवाक्