Chitra Wagh on Raghunath Kuchik arrest : तरुणीवरील बलात्कार प्रकरणी शिवसेना उपनेते कुचिक यांना अटक करा- चित्रा वाघ - चित्रा वाघ रघुनाथ कुचिक अटक मागणी
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पीडित तरुणीने राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांचे पती बाळासाहेब नागवडे तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दत्ता बाळसराफ यांच्याकडून झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. याप्रसंगी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, की कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले आहेत. तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही.
चित्रा वाघ पत्रकार परिषद
By
Published : Feb 24, 2022, 10:14 PM IST
|
Updated : Feb 25, 2022, 4:38 PM IST
मुंबई- पुण्यातील तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी शिवसेना उपनेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांना तातडीने ( Chitra Wagh on Raghunath Kuchik arrest ) अटक करावी. या तरुणीला सहा महिन्याच्या आत न्याय देण्यासाठी विशेष न्यायालयाच्या धर्तीवर यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ( Chitra Wagh press ) त्या बोलत होत्या. यावेळी पीडित तरुणीही उपस्थित होती.
पीडित तरुणीने मांडल्या व्यथा भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पीडित तरुणीने राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांचे पती बाळासाहेब नागवडे ( Balasaheb Nagwade ) तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दत्ता बाळसराफ ( Datta Balsaraf ) यांच्याकडून झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. याप्रसंगी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, की कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले आहेत. तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी सात दिवसात या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी या गुन्ह्याचा तपास कार्याचा आढावा घ्यावा.
जळगाव सेक्स स्कँडल प्रकरणी विशेष न्यायालय नेमण्यात आले होते. त्याच पद्धतीने या तरुणीला न्याय देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. पोलिसांची अनास्था की बलात्काऱ्यांना सहकार्य याचे उत्तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी द्यावे असेही त्या म्हणाल्या. 16 फेब्रुवारी रोजी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 21 फेब्रुवारीला त्यांना जामीनही मिळाला. दरम्यानच्या काळात स्पॉट पंचनामे झाले होते. हे पुरावे पोलिसांकडे जमा असताना पुणे पोलिसांनी कुचिक यांना जामीन मिळू नयेत यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असा सवालही या प्रसंगी चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
गुंगीचे औषध देऊन अत्याचार सत्ताधारी मंडळी विरुद्ध आवाज उठविणाऱ्या विरुद्ध त्वरेने गुन्हा दाखल करण्याची प्रथा महाविकास आघाडी सरकारने रुढ केली असल्याचेही चित्रा वाघ यांनी नमूद केले. या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप वचनबद्ध आहे असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या तरुणीने कुचिक यांचा आपला परिचय कसा झाला, कुचिक यांनी आपल्याशी जवळीक निर्माण करत शारीरिक संबंध कसे प्रस्थापित केले. गर्भवती झाल्यावर आपल्या गर्भपाताचे कसे प्रयत्न झाले. याचा तारीखवार वृत्तांत कथन केला. त्याआधी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांचे पती बाळासाहेब नागवडे, दत्ता बाळसराफ यांनी आपल्याला गुंगीचे औषध पाजून आत्याच्यार केले, त्याची क्लिप बनवून याद्वारे ब्लॅकमेल करत नागवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराची माहितीही या तरुणीने याप्रसंगी दिली.