महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

chitra wagh Vs Sanjay Rathod : संजय राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार -चित्रा वाघ - chitra wagh Vs Sanjay Rathod

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ( chitra wagh tweet on Sanjay Rathod ) ट्विटमध्ये म्हटले, की पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे.

chitra wagh Vs Sanjay Rathod
संजय राठोड चित्रा वाघ

By

Published : Aug 9, 2022, 2:26 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:37 PM IST

मुंबई- शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या विस्तारात आरोप असलेले आमदार संजय राठोड यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. त्याबाबत पुन्हा एकदा भाजप नेत्या यांनी चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ( chitra wagh tweet on Sanjay Rathod ) ट्विटमध्ये म्हटले, की पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. शिवसेनेचे आमदार संजय राठोड ( Shiv Sena MLA Sanjay Rathod ) यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार असल्याचे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांनी सांगितले.

शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणार का ? -शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. मात्र, तरीही चित्रा वाघ शिवसेनेच्या आमदारांवर नेत्यांवर आरोप करणार का असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला होता. असे असताना देखील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून राज्यातील महिलांवर अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार असल्याचे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले होते.

पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह -आमदार संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. यावर चित्रा वाघ यांना विचारलं असता त्या म्हणाल्या होत्या, की की आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन विचारावा, मी माझी लढाई अजून ही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. तसेच पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लिन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याच बरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही. असे यावेळी वाघ म्हणाल्या होत्या.

हेही वाचा-Nagpur Police : राज्यात कुठूनही करा डायल 112; नागपूर ग्रामीण पोलिसांचा रिस्पॉन्स, राज्यात अव्वल !

Last Updated : Aug 9, 2022, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details