मुंबई -टीका आणि विरोध करायला अक्कल लागते का,? असा सवाल विचारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला होता. त्याला प्रत्यूत्तर देत प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते, असे भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh on CM) यांनी म्हटले आहे.
Chitra Wagh on CM - 'मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही सोडवायला अक्कल लागते' - चित्रा वाघ - इंदापुर मुलीची आत्महत्या प्रकरण
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात सरकारने अक्कल कुठे कुठे वापरली आहे. तर सरकारने अक्कल वापरली खंडणी गोळा करण्यामध्ये आणि गुन्हेगारांना वाचवण्यासाठी. थोडीफार तर अक्कल राज्यातल्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी वापरा, असे आवाहनही वाघ ( Chitra Wagh on CM ) यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापुर (Indapur girl suicide) मध्ये शाळेत शिकणाऱ्या सिद्धीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. काही दिवस आधी मालेगावमध्ये आशिया नावाच्या मुलीने आत्महत्या केली. कारण काय होतं तर ती फॅशनेबल कपडे वापरते. हे कारण असू शकते आणि या दोन्ही प्रकरणांमध्ये जर पोलिसांनी योग्य वेळीच दखल घेतली असती तर मुलींचे जीव वाचले असते. राज्याचे मुख्यमंत्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेच्या समोर आले. 25 हजार महिला राज्यातून गायब झालेल्या असताना राज्यातील महिला, मुली छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करतात. महिलांच्या सुरक्षेवर एकही शब्द न बोलता डायलॉगबाजी करून त्यांनी ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बंद केली. मुख्यमंत्री महोदय प्रश्न विचारायला नाही प्रश्न सोडवायला अक्कल लागते, असा टोला भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
सरकारने कुठे वापरली अक्कल ?
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात सरकारने अक्कल कुठे कुठे वापरली आहे. तर सरकारने अक्कल वापरली खंडणी गोळा करण्यामध्ये आणि गुन्हेगारांना वाचवण्यासाठी. थोडीफार तर अक्कल राज्यातल्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी वापरा, असे आवाहनही वाघ यांनी केले आहे.
हेही वाचा -Makarsankrant Effect : नागपुरात पतंग काढताना तरूणाचा मृत्यू तर औरंगाबादेत पक्ष्यांवर संक्रांत