महाराष्ट्र

maharashtra

Children's Day : मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगीतून 'या' दहा वर्षीय बालिकेने जीवाची बाजी लावून वाचवले 17 जणांचे प्राण

By

Published : Nov 14, 2021, 6:08 AM IST

देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children's Day) साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी रविवारी साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त ईटीव्ही भारतने असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांचे कतृत्व बालवीर या लेख मालिकंतून मांडले आहे..

zen-sadavarte
zen-sadavarte

मुंबई -देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो (Children's Day in India). बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.

22 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईतील परेल विभागामध्ये असलेल्या क्रिस्टल टॉवर या 19 मजली इमारतीला आग लागली होती. या आगीतून 17 जणांचे प्राण अवघ्या दहा वर्षीय झेन सदावर्ते या मुलीने वाचवले होते. तिच्या या शौर्याची दखल घेत केंद्र सरकारने झेनला 2020 मध्ये शौर्य पुरस्कार प्रदान केला होता. आपल्याला शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर आपण 17 लोकांचे प्राण वाचवू शकलो. तसेच तो दिवस आपण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, असं झेन अजूनही मोठ्या अभिमानाने सांगते.

त्या दिवशी काय घडलं होतं ?

झेन सदावर्ते हिने सांगितले की, 22 ऑगस्ट 2018 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्रिस्टल टॉवरच्या 12 व्या मजल्यावर आग लागली होती. आगीमुळे संपूर्ण मजल्यावर धुराचे लोट पसरले होते. इमारतीमध्ये अडलेले लोक भीतीने पळत होते. त्यावेळी झेनने सर्व लोकांना एकत्र करून सांगितले की, कॉटनचा कपडा ओला करून नाक व तोंडासमोर धरा. त्यामुळे धूर नाका-तोंडात जाणार नाही व लोक गुदमरणार नाहीत. अशा प्रकारे झेनने 17 लोकांचा जीव वाचवला.

शौर्य पुरस्कार आपल्याला मिळणार ही आपल्यासाठी आनंदाची बाब होती. मात्र आपल्याला पुरस्काराचा कधीही हेवा वाटत नाही. पण पुरस्कारामुळे चांगले काम करण्याचं बळ मिळत असल्याचं झेन आवर्जून सांगते. शाहीन बाग आंदोलन सुरु असताना आंदोलनामध्ये चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. झेननेच सर्वोच्च न्यायालयाला याबाबत पत्र लिहित या आंदोलनाची दखल घेण्यास सांगितले. तसेच अशा आंदोलनामध्ये लहान मुलांना का आणण्यात येते, असे प्रश्न देखील उपस्थित केले होते. आताही झेन नेहमीच सामाजिक प्रश्न घेऊन पुढे येते.

खास करून शैक्षणिक बाबतीत मुलांना न्याय दिला जात नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून मोठी लढाई करणे गरजेचे असल्याचेही झेन सांगते. प्रत्येक नागरिक आणि सामाजिक भान बाळगत एकमेकांना मदत करणे आवश्यक असल्याचेही झेनचे मत आहे. खास बाल दिनाच्या निमित्त झेन सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी..

झेन सदावर्तेची मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details