मुंबई -राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. यामुळे बंद करण्यात आलेला निधी कक्ष तातडीने सुरू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे.
हेही वाचा... ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राजभवनावर 'प्रहार', बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने, राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत देखील बंद झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांनी, राज्यातील गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी हा कक्ष पुन्हा सुरू करावा, यासाठी राज्यपालांना पत्र लिहत विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः या पत्राबाबत ट्विट करत ही माहिती दिली.