मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानंतर लगेच पर्यावरणाचा विचार करून एका मागोमाग एक निर्णय घेऊन त्यांनी पर्यावरणप्रेमींना दिलासा दिला आहे. आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई अहमदाबाद मार्गावर सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेनला ब्रेक लावतील असे बोलले जात आहे. पहिल्यापासून आमचा बुलेट ट्रेनला विरोध आहे. याबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी म्हटले.
'आरे'नंतर बुलेट ट्रेनबाबतही मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- मनीषा कायंदे - मनिषा कायंदे
मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील अनेकांच्या सुपीक बागायती जमिनी या प्रकल्पासाठी जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. असे असताना कुणाच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन करण्याचा घाट देवेंद्र फडणवीस सरकारने केला याचा पूर्ण अभ्यास केला जाईल असे शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी सांगितले.
सामान्य माणसाला त्याचे तिकीट परवडणार नाही. तसेच मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील अनेकांच्या सुपीक बागायती जमिनी या प्रकल्पासाठी जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील 28 पैकी बुलेट ट्रेनचा फक्त एक चतुर्थांश भाग हा महाराष्ट्रात आहे तर उर्वरित भाग गुजरातमध्ये आहे. असे असताना कुणाच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन करण्याचा घाट देवेंद्र फडणवीस सरकारने केला याचा पूर्ण अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्याबद्दल निर्णय घेतील असे आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटले.