मुंबई -खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे प्रयत्न केले पाहिजे होते. पण ज्यांची दिशा चुकली आहे आणि विचारांची दशा झाली आहे. त्यांचा षण्मुखानंद सभागृहात दशावतार चालू होता आणि या दशावतरामध्ये आमच्या कोकणात एक पांडू असतो, तो पांडू कोण? असा प्रश्न उपस्थित होतो, असे प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची भाषा ही तुकडे तुकडे गँग सारखी होती, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले आशिष शेलार -
मुख्यमंत्र्यांनी दिशा देऊन महाराष्ट्राला विचारांचे सोने देणे अपेक्षित होते. पण त्यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याचा उल्लेख केला म्हणून दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की, सकाळीच झालेला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा हा विचारांची श्रीमंती असलेला होता आणि संध्याकाळी जो झाला तो वातानुकूलित सभागृहातील उसनवारीचा मेळावा होता, असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.