महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM appeals to MLA in Guwahati : शिवसेना पक्षप्रमुख पुन्हा झाले भावूक, काल गद्दार ठरवलेल्या बंडखोरांची आता वाटतेय काळजी - बंडखोर आमदार

शिवसेना ( Shivsena ) पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आपल्या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा साद घातली आहे. तुम्ही गुवाहटीत अडकून पडलेला आहात, मला तुमची काळजी वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्यासमोर येऊन बोला, आपण बसून मार्ग काढू असे त्यांनी म्हटले आहे.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

By

Published : Jun 28, 2022, 4:11 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आपल्या आमदारांना पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले आहे. या नव्याने केलेल्या आवाहनात ते म्हणतात की, शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र ! आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत, आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या, माझ्यासमोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू. आपला नम्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे.

काल गद्दार ठरविले, आता वाटते काळजी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भाऊक असे आवाहन आपल्या आमदारांना केले आहे. बंडखोर आमदार प्रथम गुजरात आणि त्यानंतर आसाममध्ये गुवाहटीत जाऊन थांबल्यावरही त्यांनी फेसबुक लाईव्ह करून असेच भावनिक आवाहन केले होते. तथापि, बंडखोरांनी कोणतीही माघार घेतली नाही, तर आम्ही शिवसेनेतच असल्याचे सांगत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत पुन्हा युती करीत सरकार स्थापन करावे असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेत शिवसेना कार्यकर्त्यांच्या, जिल्हाप्रमुखांच्या बैठका घेतल्या. या सगळ्या घटनाक्रमात बंडखोरांना गद्दार संबोधले गेले. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही अनेक गंभीर आरोप बंडखोरांवर केले. बंडखोरांच्या कार्यालयांवर, घरांवर शिवसैनिकांकडून अनेक ठिकाणी हल्ले केले गेले. तरीही बंडखोर आपला वेगळा गट तयार करून आहेत. दिवसागणिक त्यांच्या गटात आमदारांची भर पडत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख या नात्याने पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : त्या आमदारांची नावे जाहीर करावे उगाच आकडे सांगू नयेत - शिंदेचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details