मुंबई -गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी (दि. 24 एप्रिल) प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्त आज राज्यात सुरू असलेल्या भाजप आणि शिवसेना विरोधातील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील भाजप-शिवसेनेतील वाढता वाद पाहता मुख्यमंत्री यांनी कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला जाणार आहे. याकरिता नरेंद्र मोदी स्वतः आज मुंबईत या पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे फेब्रुवारी महिन्यात निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ( Lata Dinanath Mangeshkar Award ) देण्यात येईल, अशी घोषणा मंगेशकर कुटुंबीयांनी केली. याचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अशीही घोषणा करण्यात आली आहे. आज लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 80 वी पुण्यतिथी असून त्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मंगेशकर परिवार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने ( Master Dinanath Mangeshkar Smriti Pratishthan Charitable Trust ) जारी केलेल्या एका पत्रकातून ही माहिती देण्यात आली होती.