महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत #CAA, #NRC विरोधात ठराव मंजूर करावा' - असदुद्दीन ओवैसी सीएए

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळ, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाच्या धर्तीवर विधानसभेत #CAA, #NPR आणि #NRC विरोधात ठराव मंजूर करावा, अशी विनंती खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुंबईत केली.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवैसी

By

Published : Jan 29, 2020, 4:09 AM IST

Updated : Jan 29, 2020, 4:58 AM IST

मुंबई- महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळ, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाच्या धर्तीवर विधानसभेत #CAA, #NPR आणि #NRC विरोधात ठराव मंजूर करावा, अशी विनंती खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुंबईत केली. यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी, असेही आवाहन त्यांनी केले. यासाठी सरकारने तातडीने एक अधिवेशन बोलवावे आणि त्यात हा ठराव मंजूर करावा. आम्ही महाराष्ट्रात कदापि हे कायदे लागू करणार नाही असा संदेश देशाला द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

असदुद्दीन ओवैसी

आग्री पाडा येथे असलेल्या झुला मैदानात व्हॉईस ऑफ मुंबई या संस्थेच्यावतीने #CAA, #NRC विरोधात जाहीर सभेचे आयोजन केले होते, त्यावेळी ओवेसी यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

हेही वाचा -

भारतात ७० वर्षाच्या कालावधीत कधीही धर्माच्या नावावर कायदा बनवला नाही, पण मोदींनी हा काळा कायदा आणला. भाजपचे लोक खोटे बोलत असतात. मी.मोदींना आव्हान देतो, त्यांनी येऊन माझ्यासोबत #CAA, #NCR वर चर्चा करावी. हे कायदे या देशातील दलित, आदिवासी बहुजनांच्या विरोधात आहेत. भारताचे स्वातंत्र्य हे याच गरीब लोकांमुळे जिवंत आहे. त्यामुळे आम्हाला आता या लोकांच्या विरोधात पुन्हा एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लागणार असल्याचे ओवेसी म्हणाले.

आसाममध्ये अमित शाह हे बंगाली लोकांना नागरिकत्व देत आहेत, आणि तेथील नागरिकांना मात्र नागरिकत्व नाकारत आहेत. असा आरोपही त्यांनी केला. अशाच प्रकारे देशात जर आमचे नागरिकत्व हिसकावून घेतले जात असेल तर आम्ही कसे गप्प राहू? असा सवाल त्यांनी केला.आमच्या बापजाद्यानी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी रक्त सांडले. या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, परंतु ज्या लोकांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणताही सहभाग नव्हता, आज ते लोक आमची नागरिकता ठरविण्यासाठी काळा कायदा आणला आहे, परंतु आम्ही तो खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी मोदी - शाह यांना दिला. हे काळे कायदे मागे घ्या अन्यथा आता आम्ही मागे हटणार नाही. आज आम्ही घराच्या बाहेर निघालोय हा देश, तिरंगा, संविधान, गांधी,आंबेडकर यांना वाचविण्यासाठी. आम्ही भारतीय आहोत, जिनाचे आवाहन आम्ही त्यावेळी ठोकरले होते, याची जाणीवही त्यांनी मोदी शाह यांना करून दिली.
--
शेकडो लाईट आणि उद्देशिकेचे वाचन

आम्ही #CAA, #NRC, #NPR या कायद्याच्या विरोधात हातात तिरंगा घेऊन घराच्या बाहेर निघालोय. हा देश, संविधान आणि महात्मा गांधी, आंबेडकर यांना वाचविण्यासाठी निघालोय. असे सांगत आग्रीपाडा येथे असलेल्या झुला मैदानात शेकडो उपस्थितांनी पेटवलेल्या मोबाईल लाईटच्या साक्षीने खासदार ओवेसी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन केले. ओवेसी यांच्यासोबत झुला मैदानात जमलेल्या शेकडो महिला आणि नागरिकांनी हातातील मोबाईलच्या लाईट पेटवून या उद्देशिकेचे वाचन केले.

Last Updated : Jan 29, 2020, 4:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details