मुंबई - जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर ( Mahavir jayanti 2022) यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray greetings on Lord Mahavir jayanti ) यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच, जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. महावीर भगवान यांनी सर्व प्राणिमात्रांच्या अस्तित्वाबाबत 'जगा आणि जगू द्या', असा संदेश दिला. सत्य, अहिंसा आणि सत्प्रवृती अशा पंचशील तत्वांची शिकवण दिली. त्यांचा मानवकल्याणाचा विचार जगाला प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा -Alia Ranbir Wedding : आली लग्नघडी! आलिया-रणबीर होणार आज विवाहबद्ध